स्नेहांकिता वेब साईट सोहळा

स्नेहांकिता भारतीय चां.का.प्रभू मध्यवर्ती स्त्री संस्थेने संस्थेच्या कार्याचा विस्तार व्हावा या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा मार्ग अवलंबिण्याचे ठरविले आणि त्याला मूर्त स्वरूप आले ते दिनांक ५ मे २०१६ रोजी ‘snehankita.org’ या वेब साईटचे उद्घाटन माननीय श्रीयुत सतीश प्रधान, ठाण्याचे प्रथम नगराध्यक्ष,प्रथम महापौर , माजी खासदार यांच्या शुभ हस्ते करून. या प्रसंगी प्रधान साहेबांच्या हस्ते काही दृश्ये दाखविण्यात आली व प्रधान साहेबांनी उद्घाटन झाल्याचे जाहीर करून अतिशय महत्वाचा सल्ला उपस्थित भगिनींना केला कि " रोज वर्तमान पत्रात ताजी बातमी आपण वाचतो तसेच वेब साईटचे असते.सर्व संस्थांच्या घडमोडी वेब साईटवर त्वरित लोड केल्या पाहिजेत.तुम्ही करून इतरांना साईट व्हिजीट करण्यास उद्युक्त करावे.म्हणजे किती जणांनी व्हिजीट केले हे सुद्धा आपल्याला समजते व आपल्या साईटचे महत्व वाढते.”त्यांनी संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

आपल्या ज्ञातीतील जेष्ठ बांधवाना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते पैकी श्रीयुत सुधाकर वैद्य, शुभेच्छा देताना म्हणाले मध्यवर्तीचे शिबीर घेताना त्यांना खूप कमी प्रतिसाद मिळतो .महिला मंडळाने केलेल्या घोडदौडीचे कौतुक करून संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

श्रीयुत सतीन्द्रनाथ फडकर म्हणाले वेब साईट ही आजची गरज आहे .संस्थेची अशीच उत्तरोतर प्रगती व्हावी असे आशीर्वाद दिले. तसेच श्रीयुत शिरीष बेंद्रे व श्रीमती देवयानी कुळकर्णी यांनी सुद्धा उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरवातीस स्नेहांकिता कार्यवाह श्रीमती अपर्णा मोहिले यांनी उपस्थितांचे स्वागत केले व स्नेहांकिताच्या ४० वर्षाच्या वाटचालीतील हा अतिशय महत्वाचा दिवस असून वेब साईट निर्मिती ही संकल्पना स्नेहांकिता अध्याक्षा श्रीमती उज्ज्वला दळवी यांनी मांडून ती पूर्णत्वाला नेई पर्यंत सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारली , तसेच स्नेहांकिताचा इतिहास संकलित करून देण्याचे काम सन्माननीय सल्लागार श्रीमती शालिनीताई खोपकर यांनी केले तर सर्व स्पर्धा, पुरस्कार, पारितोषिके वगैरे याची माहिती संगठीत करण्याचे कार्य सल्लागार श्रीमती रूपा देशमुख यांनी केले तसेच सन्माननीय सल्लागार शकुन ताई हजिरनीस यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले हे सभेस सांगितले.

स्नेहांकिता अध्याक्षा उज्ज्वला दळवी उपस्थितांचे स्वागत करून म्हणाल्या ज्ञातीतील जेष्ठ आणि श्रेष्ठ असे विशेष अतिथी उपस्थित आहेत त्यानं आवर्जून सांगावेसे वाटते कि २०१४ साली वाशी येथील शिबिरात स्नेहांकितास मोठ्या प्रमाणात निधी मिळाला व त्यामुळेच संस्थेची आर्थिक बाजू मजबूत झाली आणि वेब साईट निर्मितीचा आमचा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी होऊ शकला. तसेच संस्थेने ज्ञाती बाह्य समाजासाठी काही कार्य करण्याचे पाऊल टाकले, त्यासाठी मिळालेल्या निधीच्या व्याजातून आम्ही नेरे येथील शांतीवन आश्रमशाळेतील विद्यार्थी दत्तक घेतले,व तेथील ४५० विद्यार्ध्याना एक वेळेचे भोजन दिले.हा उपक्रम स्नेहांकिता कायमस्वरूपी चालू ठेवणार असून या कार्यात उत्तरोत्तर वाढ कशी होईल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे सभेस सांगितले .

या वेबसाईट मध्ये संस्थेच्या ४० वर्षाची वाटचाल, विविध उपक्रमाची माहिती तर आहेच. त्याचबरोबर स्नेहांकिताला संलग्न असलेल्या सर्व संस्थांचा वैयक्तिक इतिहास सुद्धा सामावलेला आहे हे ही सांगितले. वेब साईट कशा प्रकारे operate करायची या साठी लवकरच महिलांसाठी WrkShopचे आयोजन करणार असल्याचेही श्रीमती उज्ज्वला दळवीनी जाहीर केले.

स्नेहांकिता विश्वस्त श्रीमती जयलक्ष्मी गुप्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले व स्नेहांकीतास गुरुस्थानी असलेल्या श्रीमती शालिनीताई खोपकर यांनी कौतुकाची थाप म्हणून या गोड प्रसंगी पेढे पुरस्कृत केले हे जाहीर केले. हा सोहळा आनंददायी व यशस्वी करण्यासाठी स्नेहान्कीताच्या पदाधिकार्यानबरोबरच स्नेहश्री सी.के.पी. महिला मंडळ वाशीच्या महिलांनी कार्यालयाच्या कामकाजाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून खूप मेहनत घेतली हे विशेष नमूद करावेसे वाटते. तसेच उपस्थित महिलांपैकी काही भगिनींनी अतिशय सुरेल अशा आवाजात भक्तीगीत, भावगीत,हास्यगीत उत्स्फूर्त पणे सादर करून कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

सर्व मान्यवर, पदाधिकारी, संलग्न संस्थांच्या सभासद भगिनी यांच्या उपस्थितीत वेब साईट लौंच सोहळा वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिअशनच्या कोन्फ़रन्स हॉल मध्ये थाटामाटात साजरा झाला.

सौ. उज्ज्वला दळवी

अध्याक्षा , स्नेहांकिता


  • Seminar
  • Seminar
  • Seminar
  • Seminar
  • Seminar

सन्माननीय श्री. सतीश प्रधान, ठाण्याचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर ,माजी खासदार स्नेहांकिताच्या Web Siteचे उद्घाटन करताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत स्नेहांकिताच्या सर्व पदाधिकारी आहेत.