चांदसेनीय कायस्थ प्रभू सभा, ठाणे.

“स्नेहदा” महिला शाखा

“कै. सर गोविंद बळवंत प्रधान
चां. का .प्रभू ज्ञातीगृहा”
खारकर आळी, ठाणे-४००६०१.
टेलीफोन: २५४११४२३

चांदसेनीय कायस्थ प्रभू सभा, ठाणे या संस्थेने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व व्यासपीठ मिळावे यासाठी सभेने 17 ऑगस्ट 1977 रोजी महिला शाखेची स्थापना केली. मंडळाचे नामकरण 1998 साली स्नेहांकीताचे शिबीर, ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे झाले.

हे मंडळ कथाकथन, एकपात्री प्रवेश सणावरील कार्यक्रम, नाटक, खेळांच्या व पाठांतराच्या स्पर्धा, खाद्यपदार्थ व कला स्पर्धा आम्ही वर्षभर राबवित असतो.

दर दोन वर्षांनी कार्यकारिणीची निवडणूक होते. पदाधिकाऱयांची निवडणूक होत नाही. ते शिडीपमाणे चढत जातात. सह सेकेटरची निवड निवडणूकीत जिला जास्त मत मिळाली व ती दोन वर्ष कार्यकारिणीतून काम करत असते तिचीच सह सेकेटरी म्हणून निवड होते.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेकेटरी, सह सेकेटरी असे पाच पदाधिकारी असतात. माजी अध्यक्ष कार्यकारिणीत असतात. एकंदर दहाजणी कार्यकारणीत असतात.

अध्यात्मिक, आरोग्य, स्त्रियांचे आजार यावर तज्ञांना बोलावितो. ब्रह्मविद्येबद्दल, योगाबद्दल पण त्यामधील तज्ञ महिलांना माहिती देण्यासाठी बोलावितो. खेळ, स्पर्धा व इतर कार्यक्रमासाठी दोन भगिनींची समिती नेमाने व त्यांना दोघीजणी मदतनीस असतात. त्यांनी सर्व कार्यकमाचे आयोजन करायचे. मंडळ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होते. महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी मंडळ दुपारी चार वाजता भरते. महिन्यातून एकदा कार्यकारिणीची सभा असते. त्या वेळेला कार्यक्रमाबद्दल चर्चा होते.

नविन कार्यकारिणीची सभा जून महिन्यात नव्या व जुन्या कार्यकारिणी महिलांना बोलावून सभा होते. मंडळाचा वर्धापन दिन, कोजागिरी पौर्णिमा, वासंतिक उत्सव ह्या दिवशी मंडळाच्या भगिनी कार्यक्रम करतात किंवा आम्ही एखादा बाहेरचा कार्यक्रम आणतो.

मंडळाची खाद्यपदार्थ स्पर्धा व कला स्पर्धा ही जानेवारी महिन्यात होते. ही स्पर्धा ठाण्यातील सर्व ज्ञातींतील महिलांसाठी खुली असते. तीन गट असतात
1) शाकाहारी गोड पदार्थ
2) शाकाहारी तिखट पदार्थ
3) मांसाहारी पदार्थ
4) आयत्यावेळचे स्पर्धा (कला स्पर्धा) .

ह्या स्पर्धेला आम्हांला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो. बाहेरगावच्या फक्त आपल्या ज्ञातींतील भगिनींना ह्या स्पर्धेत भाग घेता येतो. दादर, बोरीवली, कांदिवली, दहिसर, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर, वाशी येथून स्पर्धक येत असतात व बक्षिसे मिळवितात. ह्या स्पर्धेची ठाणेकर महिला वाट पाहात असतात.

सकाळी 9 वाजता आमच्या कार्यकारिणीतील भगिनी व इतर मदतनीस भगिनी येतात. रात्री 8 वाजता प्रदर्शन संपते. संबंध दिवस भगिनी हसत मुखाने काम करतात. तो दिवस खूप छान जातो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारी चहा कॉफी व परत सात वाजता कॉफी असते. प्रदर्शनाला चांगला पतिसाद मिळतो. आम्ही पत्येक गटासाठी विषय sतो. आमच्या भगिनी आम्हांला खूप मदत करतात व ही स्पर्धा यशस्वी करतात. ह्या स्पर्धेत भगिनींचा सुगरणपणा व कला स्पर्धेत कलात्मका दिसून येते. परिक्षकांची खरी कसोटी असते.

एप्रिल महिन्यात वासंतिक उत्सव असतो. त्या दिवशी मंडळातील महिला सुंदर कार्यक्रम बसवतात व हा उत्सव साजरा करतात. कार्यक्रमाचे लिखाण, दिग्दर्शक हे भगिनीच करतात. भगिनींना मंडळांनी मंच दिल्यामुळे भगिनी स्वत:चे कार्यक्रम करतात. मंडळाला बक्षिसे मिळवून देतात.

स्नेहांकिताच्या शिबिरात दोन्ही सत्रात मंडळ सहभागी असते व दोन्ही सत्रात बक्षिस मिळते.

आम्ही आमच्या भगिनींना मंच दिल्यामुळे त्यांना इतर मंडळात व बाहेरगावी पण कार्यक्रम करायला बोलवितात.

भगिनींचे वाढदिवस साजरे करतो. मंडळाचे स्नेहदा भजनी मंडळ असे भजनी मंडळ आहे. हे मंडळ ठाण्यात व बाहेरगावी भजन करण्यास जातात.

एप्रिल महिन्यात वासंतिक उत्सव असतो त्या दिवशी स्पर्धेचा बक्षिस समारंभ व खाद्यपदार्थ व कला स्पर्धेचा बक्षिस समारंभ असतो नामंकित भगिनींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावितो व करमणुकीचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी आंबेडाळ व पन्हे भगिनींना देतो. आमचे कार्यकारिणी मंडळ आंबेडाळ बनविते. पन्हे व आंबेडाळीवर सर्व भगिनी खूष असतात व असा आमचा वर्षांतील शेवटचा दिवस खूप गोड रितीने संपतो.

सौ.प्रतिभा मेढेकर
“अध्यक्षा”
“स्नेहदा” महिला शाखा


  • Snehada
  • Snehada