वाशी सी.के.पी. महिला मंडळाची स्थापना २०-१०-१९८७ रोजी मकर संक्रांतिच्या हळदी कुंकुवाचा शुभ योग साधून कै.श्रीमती प्रभावती प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झाली.१९९३ च्या फेब्रुवारी महिन्यात पहिली कार्यकारणी अस्तित्वात आली व मंडळाचे नामाभिधान 'स्नेहसंवर्धन कायस्थ महिला मंडळ' असे झाले.पहिल्या कार्यकारिणीतील सदस्य पुढील प्रमाणे :

 1. सौ .प्रभावती प्रधान---- अध्यक्षा
 2. सौ. गुलाब चिटणीस : उपाध्यक्ष \ सौ. उज्ज्वला दळवी सचिव
 3. सौ. अपर्णा मोहिले ---- सचिव / सौ. रोहिणी देशपांडे ---खजिनदार
 4. सौ.उज्ज्वला प्रधान--- खजिनदार
 5. सौ. संगीता खळे ---- खजिनदार

एप्रिल १९९७ मध्ये सौ. प्रभावती प्रधान यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सौ. उज्ज्वला दळवी यांना सुपूर्द केली. तदनंतर नव्या मुंबईत स्थायिक असलेल्या कायस्थ कुटुंबाचा मागोवा घेत आम्ही मंडळाची सभासद संख्या विस्तारित करण्याच्या कामात व्यग्र होतो. १९९७ साली नवीन कार्यकारिणीची स्थापना झाली त्यानुसार पुढील कार्यकारिणी अस्तित्वात आली .

 1. सौ. उज्ज्वला दळवी---अध्यक्षा
 2. सौ. अपर्णा मोहिले उपाध्यक्षा
 3. सौ. संगीता खळे ----- सचिव
 4. सौ. हर्षा प्रधान--------सहसचिव
 5. सौ. रोहिणी देशपांडे ---खजिनदार
 6. सौ. उज्ज्वला प्रधान----- खजिनदार
 7. सौ. संगीता खळे -----खजिनदार

हि कार्यकारिणी कार्यरत असताना संस्था नोंदणीकृत करावे असे सर्वानुमते ठरले व संस्थेचे पुन्हा एकदा नामकरण होऊन 'स्नेहश्री चां.का.प्रभु महिला मंडळ, वाशी असे संबोधले.

संस्था धर्मादाय आयुक्त ठाणे यांच्याकडे २१ एप्रिल १९९९ रोजी नोंदणीकृत केली व संस्थेचा नोंदणी क्रमांक महा/२६०-९९ /ठाणे असा आहे.

मुख्यत्वे करून कायस्थ स्त्रियांच्या उत्कर्षासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने छोट्या स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करीत असतो त्यात मैदानी खेळ, वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा, पाककला यांचा समावेश असतो.

आपली संस्कृती जोपासण्यासाठी मकर संक्रांत, चैत्र गौरी हळदी कुंकू तसेच श्रवण श्रावण महिन्यात कुमकुम अर्चना असे सोहळे सातत्याने करत आलो आहोत.

हे सर्व करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो हे विसरलो नाही. २६ जुलै २००५ रोजीआलेल्या पुरामधील पूरग्रस्त पिडीताना आमच्या भगिनींनी मोठ्या प्रमाणावर स्वेच्छेने अन्न वस्त्र व इतर वस्तू दान केल्या.

आमच्या संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी 'स्नेहांकिता ' या संस्थेकडून आम्ही बरेच काही शिकलो व शिस्तबद्ध कामकाजाची प्रेरणा मिळाली.स्नेहांकिताच्या उपक्रमात आमच्या संस्थेचा सक्रिय सहभाग असावा असे सतत वाटत असल्यमुळे स्नेहांकिता तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिबिराचे आयोजन करण्याची जबाबदारी व २००० सालचे १९वे शिबीर आणि २०१४ सालचे ३०वे शिबीर आयोजित करून स्नेहश्री वाशी संस्थेने दिमाखदारपणे साजरे करून स्नेहांकिताच्या कार्यात आमचा सक्रिय सहभाग पार पाडला.

२००० सालचे शिबीर ३० जानेवारीस नव्या मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्य गृहात साजरे झाले. या शिबिरास ११०० भगिनींची उपस्थिती होत्या व स्नेहांकिता तर्फे भगिनींचे शिबीर शुल्क रु,७५ आकारण्यात आले होते.

स्नेहश्री संस्थेच्या अध्यक्षा सौ. उज्ज्वला दळवी होत्या तर स्नेहांकिताच्या अध्यक्षा होत्या श्रीमती शकुनताई हजिरनीस . समारंभाच्या अध्यक्षा होत्या श्रीमती पुष्पाताई पाटील (विश्वस्त व सचिव रामराव आदिक एज्युकशन सोसायटी)

उदघाटीका होत्या अभिनेत्री श्रीमती स्वाती चिटणीस आणि प्रमुख पाहुण्या होत्या अभिनेत्री सुलभा देशपांडे शिबिरातील बौद्धिक सत्रातील विषय होते

 1. विवाहित स्त्रीला मित्र असावा की नसावा ?
 2. विभक्त कुटुंब पद्धती उपकारक कि अपकारक .

सांस्कृतिक सत्रातील स्पर्धेचा विषय होता महाराष्ट्रातील लोकनृत्य या स्पर्धेत अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला दादर संस्थेतील ७३ वर्षीय भगिनीने कोळी नृत्यात सहभाग घेतला होता हे विशेष.

स्पर्धेची सुरवात स्नेहश्री वाशी संस्थेच्या सोनाली देशपांडे या भगिनीने अप्रतिम असा जोगवा सादर करून केली. तर कार्यक्रमाची सुरवात रंगमंचावर अस्मानातून झोका घेत अवतरलेली पद्मजा व फिरत्या रंगमंचावर तिच्या भोवती फेर धरणाऱ्या किन्नारींची अदाकारी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.

या यशस्वी शिबिराची चर्चा सर्वतोमुखी अनेक वर्षे होती त्याने मन सुखावले तद्नंतर तब्बल १४ वर्षांनी स्नेहश्रीने पुन्हा एकदा शिबीर घेण्याचे आव्हान स्वीकारले.

या ३०व्या शिबिरात स्नेहश्रीच्या अध्यक्षा होत्या श्रीमती उज्ज्वला दळवी , शिबीर प्रमुख होत्या सौ अपर्णा मोहिले तर स्नेहांकिताच्या अध्यक्षा होत्या श्रीमती नीला प्रधान. हे शिबीर दिनांक २ फेब्रुवारी २०१४ रोजी नव्या मुंबईतील नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे संपन्न झाले.

समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या श्रीमती अस्मिता जुन्नरकर (टाटा ग्रुपच्या व्होल्टास कंपनीच्या सी.इ.ओ ) तर उदघाटीका होत्या श्रीमती पुनीत कर्णिक मराठे (फार्मास्युटीकल कंपनीच्या एक्झीक्युटीव्ह डिरेक्टर). स्नेहश्रीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे होती

स्नेहश्री अध्यक्षा सौ. उज्ज्वला दळवी, उपाध्यक्षा सौ. अपर्णा मोहिले, सचिव श्रीम.मिनल राजे,खजिनदार सौ. हर्षा प्रधान,सहाय्यक समिती : सौ. नूतन देशमुख, सौ,शलाका गडकरी,सौ. पल्लवी पालकर, सौ. प्रीती प्रधान, सौ. सीमा फणसे आणि सौ. श्रद्धा कर्णिक.

शिबिरातील बौद्धिक स्पर्धेचा विषय होता हावभावावरून मराठी मालिकांची शीर्षक गीते ओळखणे आणि गाऊन दाखवणे.

सांस्कृतिक सत्राचा विषय होता देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करणे साहित्य विषयक स्पर्धांचे विषयपुढील प्रमाणे होते.


काव्य :
 1. प्रेमा तुझा रंग कसा
 2. मिश्किली
 3. मैत्री

निबंध :
 1. पाणी अडवा पाणी जिरवा
 2. आजच्या पाल्यांना जोपासताना
 3. आर्थिक,व्यक्ती स्वातंत्र्याने तरुणीची चाललेली वाटचाल.

स्मरणिका प्रकाशन कायास्थांचा शीरपेज समजला जाणाऱ्या कानोवल्यातून झाले. नाशिक ढोलच्या तालावर स्नेहश्रीच्या भगिनी पापुद्रे सुटलेला कानोवला घेऊन प्रेक्षकांमधून मिरवत घेत आल्या अशा अविस्मरणीय सोहळ्याचे प्रकाशन केले प्रमुख पाहुण्या अस्मिता जुन्नरकर यांनी “न भूतो न भविष्यती” असा हा सोहळा रंगलाच तर त्या नंतर कायस्थी थाटात आयोजित केलेले भोजन म्हणजे जवळ्याची भजी, चिकन लोल्लीज , कोलंबीची खिचडी, खिमा पाव आणि बरेच काही याचा आस्वाद भगिनींनी यथेच्छ लुटला.

या समारंभास नव्या मुंबईतील लोकनेते माननीय गणेशजी नाईक यांनी उपस्थिती लावून स्नेहश्री आणि स्नेहांकिता दोन्ही संस्थेस शुभेच्छा देऊन मोठ्या रकमेची देणगी जाहीर केली.

स्नेहश्री संस्थेच्या अध्यक्षा सौ. उज्ज्वला दळवी यांनी स्नेहांकिताच्या अध्यक्षा श्रीं. नीला प्रधान यांना स्नेहश्री संस्थे तर्फे देणगी म्हणून रु. ३०००० चा धनादेश दिला.या पूर्वी २००० साली घेतलेल्या शिबिरात स्नेहश्रीने रु.५००० देणगी दिली होती व तेव्हा स्नेहश्रीने दिलेली देणगी त्या वेळे पर्यंत सर्व संस्थात मोठ्या रकमेची होती याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो पैकी अगदी अलीकडच्या काळातील उल्लेखनीय उपक्रम म्हंटले तर माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दिनांक १६ ऑगस्ट २०१५ रोजी सत्कार केला. यांत माध्यमिक शालान्त परीक्षेत चि. सानिका अमरेंद्र प्रधान हिने ९६.६% इतके गुण मिळवून नव्या मुंबईत प्रथम येण्याचा मान पटकाविला तर चि. संजना प्रधान 95%, चि. साहिल अमरेंद्र प्रधान ९२.४ % चि. प्रणोती पालकर ८८.०२% तर चि.अथर्व तुंगारे ७८.८ %गुण मिळवून उत्तीर्ण झाले. तसेच उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत चि. निकिता नाचणे हिने वाणिज्य शाखेत ९३.७% गुण मिळवून सी.ए.च्या एनट्रन्स परीक्षेत १०व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सागरिका जयवंत हिने विज्ञान शाखेत ८२% गुण मिळविले.व चि. विभव तुंगारे याने ८०.४७ % गुण मिळविले

३१ ऑक्टोबर २०१६ रोजी आनंद बाजार या प्रदर्शनाचे आयोजन केले.दिवाळीपूर्वी अनेक भगिनी विविध वस्तूंची विक्री करीत असतात त्यांना बाजार पेठ मिळवून द्यावी तसेच आमच्या संस्थेस काही निधी मिळावा या उदात्त हेतूने आनंद बाजारचे आयोजन केले होते.एकूण २२ भगिनींनी स्टोल बुकिंग केले होते त्यांना भरपूर नफा झाला तसेच संस्थेला रूपये २०००० चा निधी मिळाला.

या आनंद बाजार मुळे भगिनींचा आत्मविश्वास वाढला व व्यवसाय करण्यास मनोबल मिळाले यात आम्हाला आनंद आहे.

८ मार्च २०१६ रोजी नव्या मुंबईतील तळोजा येथील "परमशांती धाम" या वृद्धाश्रमास भेट दिली.


"परम शांती धाम ”

आठ मार्च हे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्नेहश्री चां.का.प्रभु महिला मंडळ, वाशी यांनी तळोजा येथील "परम शांती धाम " या वृद्धाश्रमाला भेट दिली.

या भेटीत संस्थेच्या महिलांनी सर्व वृद्धांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अनेकांच्या व्यथा ऐकताना मन व्याकूळ होत होते. तेथे राहणारा एकही वृद्ध स्वेच्छेने आलेला नव्हता.आपल्या जवळच्या अशा वाटणाऱ्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना काही कारणास्तव त्या आश्रमात सोडले असल्याचे अल्क्षात आले. तर काही व्यक्तींना पोलिसांनी आणून सोडले होते.

समाधान एकाच गोष्टीचे वाटले कि प्रेमाला वंचित झालेल्या व्यक्तींना तिथे प्रेम मिळत होते. आपल्या साथी दारांबरोबर आनंदात राहण्याचा मार्ग त्यांना सापडला होता .

सेवाभावी संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर या सेवेचे कार्य चालू आहे. संस्थेच्या संचालकांशी बोलताना समजले कि अनेक संस्था वृद्धाना सहाय्य करण्यास उत्सुक असतात त्यामुळे त्यांना अन्न,वस्त्र निवारा उत्तम प्रकारे पुरवता येते. त्यांच्यासाठी एम.जी . एम. कामोठे येथील रुग्णालयातील डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा पुरविली जाते.

स्नेहश्री,वाशी संस्थे तर्फे या वृद्धाना दैनंदिन जीवनांत उपयोगी अशा वस्तूंचे वाटप केले. त्यांत टूथ पेस्ट ,ब्रश,तेल,साबण, कंगवा,न्यापकीन व केक्स या गोष्टींचा समवेश होता तसेच त्यांना विरंगुळा म्हणून पत्त्यांचे क्याट्स सुद्धा देण्यात आले. तर काही भगिनींनी स्वखर्चाने ,पाण्यासाठी बाटल्या, प्लास्टीकचे बॉक्स, बिस्किट्स,,फळे, फ्रुटी, लिक़्विड सोप यांचे वाटप केले. या आश्रमात महिला आणि पुरुष मिळून ७० वृद्ध राहता पैकी काही वृद्ध १२/१५ वर्षाहून अधिक काळ तेथेच वास्तव्य करून आहेत.

अशा प्रकारचे ज्ञाती बाह्य समाजासाठी नियमितपणे कार्य करण्याचा आमचा मानस आहे.