स्नेहांकूर महिला मंडळाची स्थापना 14एप्रिल 1998 रोजी चैत्रागौरीच्या निमित्ताने श्रीमती सुवर्णा देशपांडे ह्यांनी चार पाच भगिनींना सोबत घेऊन केली. त्या वेळी श्रीमती देशपांडे ह्यांनी लावलेले हे रोपटे बहरतजाउन आज 25 वर्षांचा वृक्ष झाला.

21एप्रिल 2023 रोजी मंडळाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री प्रधान ह्यांच्या अध्यक्षते खाली दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या कार्यवाह श्रीमती श्रद्धा देशपांडे ह्यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात परंपरेनुसार दिपपूजन व गणेशवंदनाने करण्यात आली. त्यानंतर भक्ति सौरभ मंडळाचा "भुपाळी ते भैरवी " ह्या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विश्वस्त श्रीमती ज्योत्स्ना दिघे ह्यांच्या हस्ते, संस्थेच्या संस्थापिका श्रीमती सुवर्णा देशपांडे ह्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारानंतर मंडळातील 75 वर्षां वरील ज्येष्ठ भगिनींना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळातील सर्व सभासद भगिनींना 25व्या वर्धापनदिनाचा निमित्ताने स्मृती चिन्ह म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व कार्यक्रमा साठी कार्यकारणीचा व सर्व सभासद भगिनींनीचा उस्फूर्त प्रतीसाद व सहभाग मिळाल्या मूळे कार्यक्रम रंगतदार झाला. स्नेहांकूर तर्फे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले गेले व चविष्ट भोजनाने कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली. अशा प्रकारे रौप्यहोत्सवाचा सोहळा रंगतदार पणे संपन्न झाला.

  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur

 

  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur
  • Snehankur