'स्नेह सखी' महिला मंडळ बदलापूर

स्नेह या शब्दाचा अर्थ आहे 'प्रेम' आणि सखी म्हणजे 'मैत्रीण'. तर अशा ह्या स्नेह्साखी मंडळाची स्थापना २५ डिसेंबर २००० साली श्रीमती शुभदा वैद्य ह्यांनी केली. त्यावेळी त्यांनी लावलेले हे रोपटे आता १५ वर्षाचे झाले आहे.स्नेह सखी मंडळ वर्षभर आपले कार्यक्रम राबवीत असते. वर्षाची सुरवात मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाने होते. नंतर आम्ही एखादी छोटी सहल काढतो.पहिल्या वर्षी वांगणी मार्गे पळसदरी येथील अक्कलकोट महराज मंदिर कर्जत येथील पेशवेकालीन कडवचा गणपती, कशेळी येथील आदिवासी प्रशिक्षण केंद्र इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. भगिनींना वाचनाची गोडी लागावी म्हणूनं मंडळाने एक' बुक क्लब' स्थापन केला. त्याच प्रमाणे आमच्या सभासद भगिनी व अर्थार्जन करणाऱ्या भगिनी सुद्धा उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतात. मंडळाने पहिल्या वर्षी ठाण्याच्या सौ. वाडकर ह्यांना आमंत्रित केले होते. त्यांनी brmha विद्ये बद्दल माहिती सांगितली.ब्रम्हविद्येने क्यान्सर सारखे दुर्धर रोग पण बरे होतात हे सांगितले.

२० जानेवारी २००२ रोजी स्नेहांकिताचे शिबीर भरले होते त्यांत सांस्कृतिक सत्रातील स्पर्धेत सौ. शुभदा वैद्य लिखित 'स्नेह सखी हेल्थ क्लब' हि जाहिरात सदर केली होती. १५ ऑगस्ट २००२ रोजी दुर्गाष्टमीला 'श्री एकविरा देवीवर' कुमकुम अर्चना सोहळा सुरु केला. अशा प्रकारे वाट चालत आम्ही दुसरा टप्पा पार केला.

ह्या वाटचालीत आम्हाला जसे भगिनींचे सहकार्य लाभले तसेच ज्ञाती बांधवांचेसुद्धा लाभले. मंडळाची सुरवात २० भगिनींनी झाली ती संख्या आज १४० झाली आहे.मुरुड येथील स्नेहांकिता च्या २१ व्या शिबिरात आमच्या संस्थेने सांस्कृतिक सत्रात'म्यानातून उसळे तलवारीची पात' हे समूह गीत सदर केले होते त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. तर पुणे येथे भरलेल्या २२व्या शिबिरात वक्तृत्व सपर्धा व सांस्कृतिक या दोन्ही सत्रात भाग घेऊन दुसऱ्या सत्रात पारंपारिक गीत या विषयात देवीचा गोंधळ नृत्याद्वारे सदर केला. हळूहळू आमची सखी मोठी व धीट होत होती. चेंबूर येथील अक्षय महिला मंडळाने आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत स्नेहसखीने गरबा सदर करून तिसऱ्या क्रमांकाची ढाल व एक फिरती ढाल अशा दोन ढाली पटकाविल्या.

प्रत्येक मासिक सभेत काही नामांकित व्यक्तींना आमंत्रित करतो.बदलापूर गावातील डॉ.सौ. शालिनी व्यवहारे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी वयाच्या चाळीसी नंतर स्त्रियांना होणारे आजार व त्यासाठी घ्यवयाची काळजी या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्या नंतर सौ. अनुराधा चंद्रचूड , आयुर्वेदिक मसाजर यांना बोलविले .तसेच स्नेहसखीच्या ५ व्या वर्धापनदिनाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ विदुला देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच स्नेहांकिताच्या तेव्हाच्या विश्वस्त श्रीमती शकुन हजिरनीस, अक्षय महिला मंडळाच्या सदस्य सौ.उषा कुळकर्णी यानाही आमंत्रित केले होते.त्यावेळी 'शब्द सुरांची मैफिल ' हा बहारदार कार्यक्रम संपन्न केला.

स्नेहांकिताच्या कल्याण येथील २३ व्या शिबिरात्र 'वट पोर्णिमा'या सणावर नृत्य सदर केले .या नृत्याचे गीत आमची सभासद सौ प्रीती खारकर यांनी लिहिले होते तर चालबद्ध केले ज्योत्स्ना कारखानीस यांनी.२३ व्या शिबिरात आमचीसभासद भगिनी व कवियत्रि श्रीमती गीता गुप्ते यांना स्नेहांकिता तर्फे भगिनी गौरव पुरस्काराने गौरविले होते.

आमचे मंडळ गेली १२ वर्षे सातत्याने कुमकुम अर्चना सोहळा आयोजित करीत आहे. अनेक कार्यक्रमासाठी भगिनी देणग्या देत असतात व मंडळाचा निधी वाढविण्यास सहाय्य करतात. या व्यतिरिक्त वृद्धाश्रमाला भेट देणे,७० वर्षा वरील भगिनीचा श्री फळ व शाल देऊन गौरव करणे, पाक कला स्पर्धा आयोजित करणे . वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना बोलावून ज्ञानबोध करणे असे अनेक प्रकल्प राबवीत असतो. २०१५ साली आमच्या मंडळाला १५ वर्षे पूर्ण झाली म्हणून मंडळाच्या खर्चाने सर्व भगिनींची मुरुड येथे सहल नेली त्याच्या प्रवासासाठी १८५०० रुपये मंडळाने स्वतः खर्च केला.

स्नेहांकिताचे शिबीर आयोजित करण्याचा स्नेह सखीचा मानस आहे.

जय हिंद ---जय महाराष्ट्र

सौ अश्विनी अशोक सुळे (अध्यक्षा)

स्नेहसखी महिला मंडळ, बदलापूर आयोजित वर्धापन दिन आणि महिला दिन समारंभ

स्नेहसखी महिला मंडळ या संस्थेचा वर्धापन दिन व महिलादिन दि.८ मार्च रोजी Harmony Resort Badlapur येथे एकत्रीतपणे साजरा करण्यात आला.सर्व् प्रथम तेथील कर्मचाऱ्यांनी सर्व महिलांच्या मनगटावर एक बॅड बांधून आमचे स्वागत केले.

त्यानंतर नित्य प्रार्थना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सांगण्यात आले. सौ.ज्योत्स्ना कारखानीस यांनी आपल्या सुमधूर आवाजात गणेश वंदना गाऊन व स्वागतगीत म्हणून मान्यवरांचे स्वागत केले. तसेच त्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या भगिनींस बक्षीसे देण्यात आली.

या कार्यक्रमाची जबाबदारी , सौ.प्रेरणा प्रधान उपाध्यक्षा व सौ.नीशा गुप्ते सचिव यांनी पार पाडली. मंडळाच्या अध्यक्षा सौ.शीला दुर्वे यांनी आपले मनोगत मांडले व अहवाल वाचनातून वर्षभराच्या कामाचा आढावा घेतला. सौ.बागेश्री दिघे,सदस्या यानीं महिलादिना विषयी थोडक्यात माहिती सांगीतली.

नंतर सर्व महिला स्विमिंग पूल कडे वळल्या आणि मग काय विचारता स्विमिंग, रेन डान्स, वेगवेगळ्या राईडस् इ. सर्वत्र महिलांनी अगदी धुडगूसच घालण्यास सुरुवात केली. काही जेष्ठ महिलासुद्धा आपले वय विसरून पाण्यामध्ये मनसोक्त डुंबत होत्या. यामध्ये दोन अडीच तास कुठे गेले ते कळलेच नाही. आणि मग सगळ्या पुन्हा एकदा फ्रेश होऊन अप्रतिम अशा व्हेज/नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद घेण्यास सज्ज झाल्या. हसत खेळत सर्वांचे जेवण झाले. त्यानंतर सर्व जणी बागेत फिरायला गेल्या तेथे असलेले पक्षी हाऊस पाहिले विविध भाज्यांचे तयार केलेले वाफे पाहिले तर कुणी झोपाळ्यावर बसले.

अशाप्रकारे मजा करत सर्व जणी पुन्हा हाॅल मध्ये जमल्या. नंतर काहींनी लावणी सादर केली तर काहींचे पाय कोळीगीतावर थिरकले. अशाप्रकारे दिवसभराचा भरगच्च असा कार्यक्रम झाल्यावर निरोपाची वेळ आली. मंडळाच्या सदस्या सौ.संगीता चित्रे सह सचिव यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. नंतर केक व चकलीचे वाटप केले गेले. जाता जाता सर्व भगिनींनी चहा-काॅफीचा आस्वाद घेतला आणि अशाप्रकारे नियोजनबद्ध असा कार्यक्रम संपन्न झाला.